म्हाडाच्या लॉटरीसाठी सुमारे ६४ हजार अर्ज, आॅनलाइन नोंदणी संपली

मुंबई  – म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी करण्यात येणारी आॅनलाइन नोंदणीची मुदत संपली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६४ हजार ६१८ अर्ज दाखल झाल्याची माहिती म्हाडाने दिली. ६३ हजार ७७२ जणांनी घरासाठी नोंदणी केली आहे. कोकण मंडळाच्या या लॉटरीची सोडत २५ आॅगस्टला होईल.
म्हाडाने आॅनलाइन लॉटरीला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे ही लॉटरी आठवडाभर पुढे ढकलली होती. मात्र त्यानंतरही ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद कायम राहिला. त्यामुळे यापूर्वी लाखोंची होणारी नोंदणी यंदा केवळ हजारांवर येऊन थांबली आहे.
दरम्यान, ८ आॅगस्टपर्यंत अर्ज भरण्यासाठी दिलेली मुदत आता १८ आॅगस्टपर्यंत देण्यात आली आहे. म्हाडाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यातील ही सर्वात मोेठी लॉटरी आहे. मात्र लॉटरी जाहीर झाल्यापासून लॉटरीमध्ये उच्च उत्पन्न गटाला दिलेल्या झुकत्या मापामुळे तसेच काही ठिकाणी घरांच्या किमती अवाजवी असल्याने या लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला.
९ हजार १८ घरांसाठीची ही विक्रमी सोडत काढण्यात येणार
आहे. आता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात २५ आॅगस्टला सकाळी १० वाजता काढण्यात येईल.

  • Related Posts

    डॉ. नितीन राऊत के चुनाव प्रचार की जोरदार शुरुआत

    नागपुर : उत्तर…

    श्री बलबीर सिंग रेणू ने 87वें जन्मदिन पर किया सम्पूर्ण शरीर दान का निर्णय

    नागपूर शहर मे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Entertainment With Photo

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर  पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान