नालासोपारा स्फोटकांचे प्रकरण : औरंगाबादला एटीएसने एकाला घेतले ताब्यात

औरंगाबाद – नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शरद कळस्करच्या औरंगाबादेतील एका मित्राला कुंवारफल्लीतून ताब्यात घेतले आहे. सचिन अणदुरे असे त्याचे नाव असून, तो कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एटीएसने दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेतून सचिनला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे त्याला नोटीस देऊन चौकशीसाठी नेत असल्याचे अधिकाºयांनी त्याच्या नातेवाइकांना सांगितले. त्याच्यासोबत त्याचा भाऊही गेल्याचे सूत्रांकडून समजले. राज्यातील चार शहरांत बॉम्बस्फोट करण्याच्या उद्देशाने बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जमविणाºया आरोपींचा गत सप्ताहात एटीएसने पर्दाफाश केला होता. अटकेतील तीन जणांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील शरद कळस्कर याचा समावेश आहे.
कळसकरच्या चौकशीत त्याच्या जवळच्या मित्रांच्या यादीत सचिनचा समावेश असल्याचे एटीएसला समजले. सचिनही हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचे त्याच्या फेसबुकवरील प्रोफाइल चित्रावरून दिसून आले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल, तर त्याला अटक केली जाईल; अन्यथा त्यास सोडून देऊ, असे एटीएसच्या अधिकाºयांनी सांगितल्याचे सूत्रांकडून समजले. त्या वेळी त्याच्या भावाने मीसुद्धा तुमच्या सोबत येतो, असे म्हणून तोदेखील अधिकाºयांसोबत मुंबईला गेला. निराला बाजार येथील रेडिमेड कापड दुकानात तो काम करतो.
सचिनचे आई-वडील हयात नाहीत. तो पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह कुंवारफल्ली येथे राहतो. सचिन मे महिन्यात राजाबाजार, शहागंज परिसरात झालेल्या दंगलीच्या वेळी हिंदू वसाहतींतील घरांना संरक्षण देण्याची भाषा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • Related Posts

    डॉ. नितीन राऊत के चुनाव प्रचार की जोरदार शुरुआत

    नागपुर : उत्तर…

    श्री बलबीर सिंग रेणू ने 87वें जन्मदिन पर किया सम्पूर्ण शरीर दान का निर्णय

    नागपूर शहर मे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Entertainment With Photo

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर  पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान